चालकास मारहाण करून पळवली मोटार,हिंजवडी पोलिसांची कामगिरी

चालकास मारहाण करून पळवली मोटार,हिंजवडी पोलिसांची कामगिरी

 


वेब टीम पुणे : वाहनचालकास बेदम मारहाण करून त्याची चारचाकी पळवून नेण्याचा प्रकार हिंजवडी-वाकड येथे घडला. पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.प्रकाश हरीराम यादव (वय-२६, रहाटणी फाटा, काळेवाडी), विशाल दामोदर पिल्ले (वय-२४, डांगेचौक, वाकड) अशी आरोपींची नावे आहेत.


पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर फिर्यादी चालक हिंजवडीकडे चारचाकी वाहनातून जात होते. वाकडच्या भूमकर चौकाच्या पुढे दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना अडवून दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व डोक्यात दगड मारले. त्यानंतर फिर्यादींची चारचाकी मोटार घेऊन आरोपी पळून गेले.

याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सागर काटे, राम गोमारे यांच्या तपास पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर सापळा रचून एकापाठोपाठ दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. चोरलेली मोटार आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments