तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’’ : किम जोंग उन

तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’’ : किम जोंग उन 

वेब टीम सोल : ‘‘आम्हाला कुणी धमकावले, तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’’, असा इशारा उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दिला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यावर दबाव टाकण्यासाठी किम यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे.

उत्तर कोरियाची राजधानी पीओंगयांगमध्ये या आठवडय़ात झालेल्या लष्करी संचलनाच्या वेळी किम यांनी आपल्या सेनाधिकाऱ्यांना संबोधित करताना हा इशारा दिला. आपल्या देशाला असलेले सर्व धोके दूर करण्यासाठी अण्वस्त्रधारी लष्कर उभारणीचा कार्यक्रम सुरूच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इतर देशांनी धमकावणे सुरूच ठेवले तर आम्ही प्रथम अण्वस्त्रे वापरू, असे किम म्हणाल्याचे वृत्त उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तवाहिनी कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने शनिवारी म्हटले आहे. या वृत्तानुसार हे लष्करी संचलन सोमवारी झाले.

 त्यामध्ये उत्तर कोरियाने आपले सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र सहभागी केले होते. या आंतरखंडीय अस्त्राचा पल्ला अमेरिकेपर्यंत आहे. वाहन किंवा पाणबुडय़ांतून डागले जाऊ शकेल असे घन इंधनावरील क्षेपणास्त्रही संचलनात प्रदर्शित करण्यात आले. त्याचा वापर जपान आणि दक्षिण कोरियाविरुद्ध होण्याचा धोका आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर बंदी लादून त्यासाठी आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. त्याला किम यांचा विरोध आहे

Post a Comment

0 Comments