डॉ.आंबेडकरांचे संविधान सर्वाँना समता प्रदान करणारे : ज्ञानदेव भिंगारदिवे

 डॉ.आंबेडकरांचे संविधान सर्वाँना समता प्रदान करणारे : ज्ञानदेव भिंगारदिवे

वेब टीम नगर : संविधान लिहिताना समाजामध्ये समानता कशी निर्माण होईल याचे भान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवल्याने सर्वमान्य संविधान लिहिले गेले, असे प्रतिपादन काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भिंगारदिवे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भिंगार येथील संविधान चौक (सदर बाजार) येथे ज्ञानदेव भिंगारदिवे मित्र मंडळाने आयोजित जयंती उत्सवात श्री भिंगारदिवे बोलत होते.अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.साहेबराव चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश त्रिमुखे उपस्थित होते.

गेल्या काही काळात संविधान बदलाच्या हालचाली झाल्या,मात्र बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान हे सर्वांना न्याय देणारे असल्याने प्रसंगी संविधान बचाव ही चळवळ सशक्त करावी लागेल असेही श्री भिंगारदिवे म्हणाले.

प्रारंभी भिंगार काँग्रेस महिला अध्यक्ष मार्गारेट जाधव, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शामराव वाघस्कर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सर्वश्री अनिल परदेशी, महेश नामदे, धम्मपाल शिंदे, आदींची समयोचित भाषणे झाली.

याप्रसंगी बाळासाहेब भिंगारदिवे, भूषण चव्हाण, विकास भिंगारदिवे, बाळकृष्ण यंबारे, इंदुताई भिंगारदिवे, मनीषा भिंगारदिवे, प्रीती भिंगारदिवे,यश भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.  शेवटी अनिल परदेशी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments