शहरात उद्यापासून निर्जळी

शहरात उद्यापासून निर्जळी 

वीज उपकेंद्रात दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

वेब टीम नगर : महावितरणच्या केडगाव आणि साेनेवाडी येथील उपकेंद्रात उद्या शनिवारी दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत हाेणार आहे. या शटडाऊनच्या काळात महापालिका जलवाहिनीवरील दुरुस्ती करणार आहे. ही कामे सकाळी अकरा ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे शहराचा तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहिल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, तसेच सारसनगर, बुरूडगाव परिसर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास शनिवार ऐवजी रविवारी (ता. २४) पाणीपुरवठा हाेईल.

शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली दरवाजा, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, स्टेशन रोड, आगरकर मळा, कायनेटीक चौक परिसर व सावेडी या भागाला रविवार ऐवजी साेमवारी (ता. २५) पाणीपुरवठा हाेईल.

 मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको या भागाला मंगळवारी (ता. २६) पाणीपुरवठा हाेईल.

Post a Comment

0 Comments