सुजय विखेंनी पातळी सोडून बोलु नये : ॲड .सुरेश लगड

सुजय विखेंनी पातळी सोडून बोलु नये : ॲड .सुरेश लगड

वेब टीम नगर: सुजय विखेंनी महाविकास आघाडी बदल, राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मुकी बायको व लग्नाचे निमंत्रण नसतानाही तिरस्कार सुरू असतानाही काॅंग्रेस वर्हाडी म्हणून सोबत गेली असुन लग्नातील जेवणासाठी मागे हटायला तयार नाही,काॅंग्रेसच्या मंडळींना हाणले तरी खाली बसून जेवणाचे ताट सोडायला तयार नाही असं महाविकास आघाडी सरकारच वर्णन नुकतंच केलं अस वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आज वाचलं.

सुजय अजुन तु वयाने  खुप लहान आहेस ,आपण काय बोलतो ? कुणाबद्दल बोलतो ? आपल्या चुकिच्या बोलण्याने दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो?याच थोडातरी भान ठेवायला हवे.आपण महाविकास आघाडी सरकारच जे वर्णन केले ने निच्छीतच महाविकास आघाडी सरकारची जाणीवपूर्वक केलेली बदनामी आहे . आपल्या सारख्या लोकप्रतिनिधींच्या तोंडुन अशी असंसदीय भाषा शोभत नाही.आपण अज्ञान असताना आपले पिताश्री,आपले सहकार महर्षीआजोबा कै.बाळासाहेब विखे व आपल्या मातोश्री  असे सर्वच काॅंग्रेस पक्षात होते .काॅंग्रेस पक्षाने आपल्या कुटुंबाला भरपूर मोठमोठाली पद दिली.आपल्या मातोश्री आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या . पक्षसंघटनेतही आपल्या कुटुंबाला वेळोवेळी काॅंग्रेस पक्षाने संधी दिली यांची आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीस माहिती असुनही आपण काॅंग्रेस पक्षावर व महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या पक्षाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन महाविकास आघाडी सरकारची बदनामी करताय हे बरोबर नाही.

तुम्ही व तुमचे पिताश्री  राज्यात सत्तेवर नसल्याने आपली अडचण झाली .त्यामुळे आपण आपला  राग व्यक्त करण्यासाठी ऊठसूठ बेताल  वक्तव्य  महाविकास आघाडी सरकारची जाणीवपूर्वक बदनामी करणेसाठी करत आहात.आपण महाविकास आघाडी सरकारबद्दल जे वर्णन केले आहे ते निश्चितच बदनामी करणारे असे असुन ते फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईत मोडते .आपण समाजात वावरताना पुर्ण विचारांती बोललं पाहिजे .महाविकास आघाडीला नवराबायको व वर्हाडीची उपमा  देऊन  अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहात . आपणास हे शोभत नाही.केवळ सवंग प्रसिद्धी साठी असा शब्दप्रयोग वापरु नये. वडीलकिच्या नात्याने मी आपणास हे सांगु इच्छितो.त्याचा राग येऊन देवु नये .आपण   केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल महविकास आघाडी सरकारची जाहीर माफी मागावी असे मला वाटते. 

Post a Comment

0 Comments