नगरमध्येही राज ठाकरे यांचे जंगी स्वागत
वेब टीम नगर : औरंगाबाद येथील बहुचर्चित सभेसाठी आज सकाळी शंभर पुरोहितांनी राज ठाकरेंच्या पुणे येथील निवास्थानी वेद मंत्र पठणाने प्रार्थना करून शुभेच्या दिल्यांनतर राज ठाकरे यांचा ताफा औरंगाबाद च्या दिशेने रवाना झाला. वढूज येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन करून राज ठाकरे नगरकडे रवाना झाले. नगर मध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.
राज ठाकरे यांचा ताफा नगर शहरात पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,देविदास खेडकर,शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर,जिल्हा सचिव नितीन भुतारे, उप जिल्हाध्यक्ष मनोज राऊत,प्रवक्ता केतन नवले,उप शहराध्यक्ष डॉ. संतोष साळवे,संकेत व्यवहारे, अशोक दतरंगे, अभिनय गायकवाड,पोपट अत्रे, विनोद काकडे आदी उप शहराध्यक्ष व मनसेत पुनर्प्रवेश केलेल्या अनिता दिघे यावेळी उपस्थित होत्या. राज ठाकरे यांचा ताफा नगर मध्ये सुमारे २.३० च्या दरम्यान पोहोचला यावेळी ठाकरे यांच्या गाडीवर पुष्प वृष्टी करण्यात आली तसेच जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. चौकातील खांबांवर लावलेल्या भोंग्यावरून हनुमान चालीसा वाजविण्यात आला.
एसटी स्टॅन्ड चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज ठाकरे पुष्पहार अर्पण करतील असे वाटले होते परंतु पोलिसांनी ठाकरे यांना गाडीतून खाली न उतरण्याचा सल्ला दिल्याने ते शक्य झाले नाही. कारकर्त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून गाडीचा दरवाजा उघडत उभेराहून कर्कत्यांना अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा आणि जल्लोष केला आणि ठाकरे यांचा ताफा औरंगाबाद कडे मार्गस्थ झाला. नगरला येण्यापूर्वी राज ठाकरे नगर पुणे रस्त्यावरील हॉटेल स्वीट होम येथे जेवण घेण्यासाठी थांबले होते.
0 Comments