विशाल गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्तांचा बोरुडे परिवाराच्या वतीने सत्कार
श्री विशाल गणपतीचा महिमा सर्वदूर पर्यंत पोहोचवू : अध्यक्ष अभय आगरकर
वेब टीम नगर : शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविकांच्या नवसाला पावणारे विशाल गणपती हे एक स्थान आहे. विशाल गणपतीचा महिमा सर्वदूर पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्त काम करत आहोत श्रीविशाल गणपती च्या नूतनीकरणाच्या कामामुळे मंदिर परिसरात प्रसन्नता वाढली आहे या माध्यमातून गणपतीची सेवा पूजा पाठ धार्मिकता व पवित्र्ये जपली असून या ठिकाणी सेवाभाव वाढल्यास व मदत झाली आहे सामूहिक विचाराचा परिपाक असल्यामुळेच भव्यदिव्य अशी वास्तू उभी राहिली आहे समाजामध्ये एक वाक्यता आहे.पारदर्शक कारभारामुळे नगरकरांचा श्री विशाल गणपती माळीवाडा ट्रस्टवर विश्वास निर्माण झाला आहे. पूर्वीचा आलेला पायंडा पुढे नेण्याचे काम आम्ही सर्व विश्वस्त करत आहोत विशाल गणपतीची सेवा केल्याने उर्जा प्राप्त होते यापुढील काळात सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व धार्मिकता वाढीसाठी काम करणार आहे. विशाल गणपतीचे पावित्र्ये जोपासण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे पार पाडत आहे असे प्रतिपादन ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.
अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी अभय आगरकर यांची निवड झाली व पंडीतराव खरपुडे,आशोक कानडे ,बापुसाहेब एकाडे,हरीभाऊ फुलसौंदर,रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडुरंग नन्नवरे ,संजय चाफे,हरीश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, विजयकुमार कोथिंबिरे, माणिकराव विधाते,नितीन पुंड सर यांची विश्वस्त पदी निवड झाल्या बद्दल .मा उपमहापौर अनिल बोरूडे व बोरूडे परिवार व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार संमारंभ करण्यात आला त्या प्रसंगी मा.उपमहापौर अनिल बोरूडे ,अर्जुनराव बोरूडे, विजयकुमार बोरूडे, गोरख भाऊ बोरूडे,प्रदिप बोरूडे,अभय बोरूडे, संदिप बोरूडे, सुजित बोरूडे,किरण बोरूडे, शरद बोरूडे, रमेश बोरूडे, सुनिल राऊत,राजु फुलसौंदर, गोरख पडोळे,अनंत बोरूडे, आमोल धाडगे ,अभिजीत बोरूडे ,गौरव बोरूडे, संदिप बोरूडे,चंद्रकांत बोरूडे, अनंत भैय्या बोरूडे, वैभव बोरूडे,बाळासाहेब बेरड व सर्व बोरूडे परिवारतील सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.
प्रा.माणिकराव विधाते म्हणाले की,कै रावसाहेब बोरुडे व वसंत बोरुडे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचा सामाजिक वारसा बोरूडे परिवारातील नवीन पिढीने जोपासला आहे. विशाल गणपती मंदिराच्या विश्वस्त पदी आमची एक मताने निवड केल्याबद्दल सर्व समाजाचे आभार मानतो आम्ही सर्व विश्वस्त मिळून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू असे ते म्हणाले.
नितीन पुंड म्हणाले की, अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक ते चांगले काम सुरू आहे विशाल गणपतीच्या रूपा प्रमाणे मंदिरही विशाल झाले आहे. आमच्यासारख्या तरुणांना धार्मिकतेची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.असे ते म्हणाले.
मा. उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की, श्री विशाल गणपती माळीवाडा ट्रस्ट यांनी आपली परंपरा व धार्मिकता जोपसण्याचे काम केले आहे. याच बरोबर वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. गणेश उत्सव व गणेश यज्ञ या माध्यमातून समाजामध्ये धार्मिकता वाढीस मदत होते श्री विशाल गणपती मंदिर हे नगरकरांचे एक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे सर्वजण नित्यनेमाने गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात असे ते म्हणाले.
गोरख बोरुडे यांनी प्रास्ताविक करीत सर्वांचे आभार मानले.
0 Comments