जवळा हत्याकांडातील आरोपीनचा जामीन नाकारला

जवळा हत्याकांडातील आरोपीनचा जामीन नाकारला 


वेब टीम नगर : पारनेर तालुक्यातील जवळा हत्याकांडातील आरोपी अमोल सुभाष देशमुख आणि प्रवीण दत्तात्रय चाळके यांनी जिल्हान्यायालयात  जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.  जिल्हा न्यायाधीश २  मंजुषा देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा जामीन नाकारला आहे .

जवळ्याचा गुन्हा अतिशय निर्दयी आहे.  तसेच गुन्ह्याचे स्वरूप पाहता अत्यंत गंभीर आहे. आरोपीना  जामिनावर सोडल्यास फिर्यादी वर ते दबाव आणू शकतात.  चार्जशीट पाहता आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहे.  आरोपी हे  गुन्हा घडल्यापासून काही काळ फरार होते.  आरोपी व फिर्यादी एकाच गावातील रहिवासी आहेत.  फिर्यादी यांची मुलगी नाबालिक  होती व त्याच गावात शाळेत शिक्षण घेत होती . आरोपी नंबर १आणि  2 यांनी संगनमताने सदरचा गुन्हा घडवून आणलेला होता. अशी बाजू सरकार पक्षातर्फे मांडण्यात आली .

तर आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना या गुन्ह्यात आरोपी यांचा काहीएक संबंध नाही . त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.  आरोपी हे  गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत . त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा  दाखल झालेला आहे. फिर्यादी हे उशिरा दाखल झाले आहेत असा युक्तिवाद  फिर्यादीचे वकील यांनी मांडली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश २ मंजुषा देशपांडे यांनी आज (दि . २७-४-२०२२)रोजी या आरोपीना जामीन नाकारला   जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील व मुळ फिर्यादीचे वकील सचिन पटेकर  यांनी फिर्यादीची बाजू मांडली . 

Post a Comment

0 Comments