बाळ बोठेचा जमीन नाकारला

बाळ बोठेचा जमीन नाकारला    

वेब टीम नगर : खुनाच्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हा आदेश दिला.

रेखा जरे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर नगर शहरातील एका विवाहित महिलेने बोठे विरूद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती.

त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात २७ डिसेंबर २०२० रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठे याने प्रथम जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.

तेथे न्यायालयाने तो फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात बोठे याने उच्च न्यायालयात आपील केले होते.  दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी बाळ बोठे यांना पुन्हा जमीन नाकारला आहे.

बाळ बोठे  यांची बाजू मांडताना त्यांचे वकील सबनीस व त्यांचे सहकारी करपे यांनी आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे.  तसेच फिर्यादीने उशिरा फिर्याद दिली तसे कारण फिर्यादी मध्ये सांगितलेले नाही आणि आरोपी यापूर्वी देखील खोट्या गुन्ह्यात आरोपीला अडकविण्यात आले आहे.  सदर घटनेचा आरोपीशी काहीही संबंध नाही व नव्हता आरोपीस  जामीन दिल्यास आरोपी , त्याचे नातेवाईक व इतर हितचिंतक यातील  कोणीही फिर्यादीवर दबाव आणणार नाही. या प्रकरणात आरोपीने दिलेला  कायमस्वरूपी राहाण्यांच्या पत्त्या पासून फिर्यादीचे घर यातील अंतर साधारण १० किलोमीटर इतके  आहे.  आरोपी हा नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध वृत्तपत्राचा संपादक होता.  विविध क्षेत्रात त्याचे काम उल्लेखनीय आहे.  त्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.  फक्त दुसर्‍या गुन्ह्याचा आधार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अशी बाजू  बाळ बोठे  यांच्या वकिलांनी मांडली .  त्यावर युक्तिवाद करताना सरकारी पक्षाने आरोपी वर  354 व्यतिरिक्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.  आरोपी हा रेखा जरे यांच्या सुनेकडे वाकड्या नजरेने पाहत होता.  रेखा जरे यांच्या बद्दल तिच्या सुनेला भडकवण्याचा प्रकार देखील आरोपीने सुरू केला होता.  रेखा  जरे हिच्या घरी आरोपीचे नेहमी येणे-जाणे होते . गुन्हा घडल्यानंतर फिर्याद तात्काळ देणे आवश्यक होते.  

भीतीचे वातावरण होते त्यामुळे फिर्याद उशिरा दिली.  आरोपी यास जामिनावर  सोडल्यास आरोपी हा फिर्यादी व त्यांच्या घरच्यांवर दबाव आणू शकतो . फिर्यादी व त्याच्या घरच्यांना आजपावेतो सरकारने पोलीस संरक्षण दिलेले आहे . तसेच आजपावेतो सदर कुटुंब रेखा जरे  यांच्या हत्याकांडाच्या धक्क्यातून सावरलेले नाही.  आरोपी यांच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला त्या विरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत.  आरोपीविरूदध सबळ पुरावे आहेत,त्याचे फिर्यादी महिलेसोबत वारंवार बोलणे झाल्याचे पुरावे आहेत. 

असा युक्तिवाद मूळ फिर्यादी यांच्यावतीने एडवोकेट व एडवोकेट सचिन पाटेकर यांनी केला  यावर न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेऊन बाळ मोठे यास जामीन  नाकारला आहे.

Post a Comment

0 Comments