शिक्षण संस्थांच्या प्रश्‍नांसाठी बैठक घेऊ : सुप्रिया सुळे

शिक्षण संस्थांच्या प्रश्‍नांसाठी बैठक घेऊ : सुप्रिया सुळे 


वेब टीम पुणे : राज्यातील शिक्षण संस्थांच्या वेतनेतर अनुदानचा   प्रश्न,पवित्र पोर्टल रद्द करणे,शिक्षण भरती,शिक्षकेतर कर्मचारी भरती,ग्रंथपाल सेवक भरती या प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या समवेत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. 

 महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत खंडेराया प्रतिष्ठान बालेवाडी पुणे या शिक्षण संस्थेत पार पडली.  यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, शिल्पाताई दुसुंगे ,अशोक थोरात ,रवींद्र फडणवीस, गणपतराव बालवडकर हे उपस्थित होते.  महाराष्ट्रातील खासगी शिक्षण संस्था चांगल्या बद्दल सांभाळत असतानाही त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे ,असे पदाधिकाऱ्यांनी सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. 

 सुप्रिया सुळे म्हणाल्या आई जर समृद्ध असेल तर मुलांची निगा राखू शकते मुलांवर संस्कार घडू शकतात आणि आई जर विकलांग असेल तर मुलांची वाढ होणार नाही.  त्यांचे संगोपन देखील होणार नाही.  महाराष्ट्रातील शिक्षणाची भूमिका हे मुलांच्या आईची भूमिका आहे . म्हणून तिला सदृढ करणे हे महत्त्वाचे काम आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments