गोळीबार करणारा आरोपी २४ तासात गजाआड

गोळीबार करणारा आरोपी २४ तासात गजाआड 


वेब टीम नगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री ( ता. २२ ) जीव घेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची वेगात चक्रे फिरवत गावठी पिस्तुलाने गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला २४ तासात अटक केली. नितीन विलास शिरसाठ ( वय २९, रा. वांजोळी, ता. नेवासे ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत १० गुन्हे दाखल असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

राहुल राजळे यांच्या वरील हल्ल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सोपान गोरे, विष्णू घोडेचोरे, भाऊसाहेब मुळीक, दत्तात्रय गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, शंकर चौधरी, सचिन आडबल, संतोष लोढे, संदीप चव्हाण, सुरेश माळी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, योगेश सातपुते व उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर आदींच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यासह, मुंबई व पुणे या ठिकाणी तपासासाठी तीन तपास पथके तयार करुन त्यांना आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार हे नेवासे, सोनई परिसरात पेट्रोलिंग फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील फायरींग करणारा आरोपी नितीन शिरसाठ हा शेवगाव बस स्थानक परिसरात येणार असून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार कटके यांनी त्यांच्या पथकाला सूचना दिली. पथकाने शेवगाव बस स्थानक परिसरात सापळा लावला.

एक इसम संशयित रित्या फिरतांना पथकाला दिसला. पोलिस पथकाची खात्री होताच त्या पकडण्याच्या तयारीत असतांना आरोपीस पोलिस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावू लागला. पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नितीन विलास शिरसाठ असे असल्याचे सांगितले. पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने त्याला सोनई पोलिस ठाण्यात हजर केले. पुढील तपास सोनई पोलिस करीत आहेत.Post a Comment

0 Comments