आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता

आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता 

कचरा वेचन कामगारांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याच्या प्रश्नावर  संभ्रम 

वेब टीम नगर : काल न झालेल्या बैठकीनंतर आज सकाळी बारा वाजता कचरावेचकांना बुरुडगाव येथील कचरा डेपो परवानगी देण्याच्या मागणीसाठी बैठकीचे उपायुक्तांद्वारे  आयोजन करण्यात आले होते.  मात्र आजही बैठकीला आयुक्त नसल्याने पुन्हा हा प्रश्न लांबणीवर पडला आहे.  त्यामुळे मनपा घनकचरा व्यवस्थापन आयुक्तांच्या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता लावते आहे किंवा कसे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या सदस्यांना शहरात कचरा वेचन करणाऱ्याना हक्काचा रोजगार देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका व दिल्ली येथील आर एल जी कंपनी च्या माध्यमातून अशा कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले.  शहर स्वच्छतेसाठी कचरावेचकांचा मोठा फायदा होणार आहे.

शहर स्वच्छतेच्या कामात कचरावेचकाचा मोठा सहभाग असून कचऱ्याचे वर्गीकरण आणि सुका कचरा गोळा करण्याचे काम हे कचरावेचक करीत असल्याने महापालिकेच्या कचरा डेपोत (बुरुडगाव} येथे त्यांना परवानगी दिली जाईल असे आश्वासन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिले होते.

या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त डांगे यांच्या दालनात दोन वेळा बैठकांचे आयोजनही करण्यात आले होते.  मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिका कचरावेचक कामगारांना परवानगी देण्यास टाळाटाळ करते की काय असा संभ्रम या कचरा वाचकांमध्ये झाला आहे . यासंदर्भात दिनांक 19 रोजी सायंकाळी ५ वाजता माननीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सदस्य महापालिकेत गेले काही कारणास्तव ही बैठक न झाल्याने  आयुक्तांच्या दसलनासमोर ठिय्या आंदोलन केले मात्र आंदोलनादरम्यान आयुक्तांनी फोने केला व त्यांच्या विनंतीवरून कालचे ठिय्या अंदोलन मागे घेण्यात आले होते आज दिनांक २० रोजी दुपारी १२ वाजता आयुक्तांनी या कचरा बैठक होणार असल्याचे म्हटले आहे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.मात्र आज दुपारी १२ वाजता कागद काच पत्रा वेचकांचे प्रतिनिधी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे अहमदनगर अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे, जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे व संघटनेचे अन्य कार्यकर्ते महानगर पालिकेत गेले मात्र तेथे २ वाजे पर्यंत वेळ काढूपणा करण्यात आला व त्यानंतर आयुक्त नसल्याने आज बैठक होऊ शकणार नाही असे सांगण्यात आले.        

Post a Comment

0 Comments