ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल 

मनसे प्रमुखांनी सभेत उघडपणे तलवार फिरवली, तीन साथीदारांवर शस्त्रास्त्र कायद्यात गुन्हा

वेब टीम मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरोधात ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी येथील एका सभेत त्यांनी तलवार फिरवत ईदपर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला. लाऊडस्पीकर न काढल्यास त्यांचे कार्यकर्ते मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बुधवारी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राज ठाकरे म्हणाले होते, 'सध्या मी फक्त हनुमान चालिसावर बोललो आहे. मला भात्यातले बाण काध्यायाला  भाग पाडू नका . तुमच्या घरी प्रार्थना करा. इतरांना त्रास देऊ नका. पाच-दहा-पंधरा दिवस समजण्यासारखे आहे. पण, ३६५ दिवस ते काम करणार नाही.' यापूर्वी 2 एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या सभेतही राज यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही तर मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवतील, असा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर राज्यातील अनेक भागातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

राज ठाकरे म्हणाले, '18 जुलै 2005 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, अशा धार्मिक कार्यांमुळे इतरांना त्रास होऊ देऊ नये. सर्वोच्च न्यायालयच असे म्हणत असेल, तर राज्य सरकारला काय अडचण आहे? 3 तारखेला ईद आहे. मी ३ तारखेचा अल्टिमेटम देत आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढा. अन्यथा हनुमान चालीसा सर्वत्र वाजवली जाईल. यावरून मी मागे हटणार नाही.

Post a Comment

0 Comments