“बायकोला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव”

“बायकोला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव”

बॉसची मागणी ऐकताच डिझेल ओतून आत्महत्या केली

वेब टीम लखीमपूर : बदली हवी असेल तर आपल्या बायकोला एका रात्रीसाठी पाठव अशी मागणी बॉसने आपल्या कर्मचाऱ्याकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर अस्वस्थ आणि अपमानित झालेल्या ४५ वर्षीय गोकुल प्रसाद यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. रुग्णालयाच उपचारादरम्यान त्यांच निधन झालं. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी आत्महत्येचं कारण सांगत हा खुलासा केला. उत्तर प्रदेशातही घटना घडली असून गोकुल प्रसाद ऊर्जा विभागात काम करत होते.

बॉसने पत्नीला पाठवण्याची मागणी केल्यानंतर गोकुल प्रसाद यांनी लखीमपूरमधील कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेतलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. कनिष्ठ अभियंता नागेंद्र कुमार आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून पोलीस तपास करत आहेत.

रुग्णालयात गोकुल प्रसाद यांनी व्हिडीओमध्ये आपण टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी कनिष्ठ अभियंता आणि त्याचा सहकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला. तसंच पोलिसांकडे मदत मागूनही मिळाली नसल्याचा दावा केला.

दुसऱ्या एका व्हिडीओत, त्यांच्या पत्नीने आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पतीला त्रास देत असल्याचा आरोप केला. “ते तणावात गेले होते. औषधोपचार सुरु असतानाही त्यांना त्रास देणं सुरु होतं. त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली होती जिथे त्यांना प्रवास करताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घऱाजवळ बदली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी पत्नीला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव आणि आम्ही तुझी बदली करु असं सांगितलं होतं,” अशी माहिती पत्नीने दिली आहे.

कोणीही मदत केली नसल्याचा दावा पत्नीनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित व्यक्तीने कनिष्ठ अभियंता बदली करण्यासाठी पैसे मागत असल्याचा तसंच आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचा आऱोप केला होता. आम्ही गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्याला निलंबित करण्यात आलं असून त्याची विभागीय चौकशी सुरु आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे”.


Post a Comment

0 Comments