गुणरत्न सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज दाखल; किला कोर्टात सुनावणी सुरू

गुणरत्न सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज दाखल; किला कोर्टात सुनावणी सुरू

याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वेब टीम मुंबई : मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी काल (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खबळबळ उडाली घडामोडींना वेग आला व रात्री आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. शिवाय अनेक आंदोलक कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.

याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २३ महिला आहेत.

“अटकेच्या कोणत्याही प्रक्रियेचं पालन न करता मला अतिरेक्यासारखं पोलीस स्टेशनला आणलं. माझ्या जीवाला धोका आहे. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे माझा खून होऊ शकतो. माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली आहे,” असं गुणरत्न सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल म्हणाले होते. त्यांनतर आता सदावर्ते यांना मुंबईत किला कोर्टात आणलं असून सुनावणी सुरू आहे.

गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी किला कोर्टात आणलं

गुणरत्न सदावर्ते किला कोर्टात दाखल, पत्नी जयश्री पाटील आणि वकील प्रदीप घरत किला कोर्टात पोहोचले असून सुनावणी सुरू आहे. 

तिन्ही वकिलांच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी तर इतर १०९ कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

  

Post a Comment

0 Comments