कापड बाजारातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
वेब टीम नगर : कापड बाजारातीलअतिक्रमण धारकांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून आता हाच प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.१२ मार्च रोजी रस्त्यवरील पथविक्रेत्यांचे आणि कापड बाजारातील एका दुकानदाराचे वाद झाले होते. त्यानंतर काही काळ बाजार पेठ बंद करण्यात आली होती त्या नंतर पथविक्रेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान त्या वेळी आमदार संग्राम जगताप यांच्या सह शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांनी कापड बाजारात येऊन व्यापाऱ्यांच्या बाजूने उभा राहीले होते.तर महापालिकेने दोन दिवस कारवाई करत अतिक्रमण काढले. मात्र आता पुन्हा अतिक्रमण झाले असून त्याचा त्रास व्यापाऱ्यांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे.या अतिक्रमणामुळे बाजार पेठ उध्वस्त होण्याची भीती असल्याने हा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
0 Comments