अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग

जगातील पहिली पोलीस शाळा 

अहमदनगर शहरा विषयी काही पहिल्या घटनांपैकी पोलीस शाळा ही घटना एक आहे.सन १८६७ अठराशे 67 मध्ये प्रथमच पोलीस मुख्यालया मध्ये ही शाळा सुरू करण्यात आली. त्या काळामध्ये पोलीस भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची अट नव्हती.त्यावेळेला उमेदवाराची शरीर यष्टी,वजन,उंची, धावणे,छाती त्या उमेदवाराच्या अंगाची चपळाई,या गोष्टी चा विचार करून त्याची भरती केली जात होती. भारतीय पोलिस व्यवस्था ही अनेक अनुभवातून आदर्श पोलीस व्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे.भारतीय पोलीस व्यवस्थेतून खूप काही गोष्टी जगाला दिल्या आहेत.त्यातील महत्त्वाच्या काही गोष्टी म्हणजे ठश्याचे शास्त्र, गुप्त माहिती मिळवण्याचे शास्त्र,सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस शाळा होय.एकोणिसा १९व्या शतकामध्ये पोलीस प्रशिक्षण ही कल्पनाच कोणाला पटण्यासारखी नव्हती. कारण पारंपारिक पद्धतीने व्यायाम करणे, शरीर कमावणे, आधीचे लोकांचे काम करण्याची पद्धत, विचार करणे, त्याचे निरीक्षण करणे, आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन कामात बदल व सुधारणा करणे या सर्व गोष्टींमुळे पोलिसांना शैक्षणिक पात्रता ही अट नव्हती.मजबूत शरीर यष्टी हीच पोलीस भरतीसाठी पात्रता होती. शिक्षण हे गौण मानले जायचे.दुसरी गोष्ट अनुभवातून जे येईल तो अंमलदार परिपूर्ण समजला जात होता.  



मद्रास पोलीस ऍक्ट नुसार पोलिसाने गुन्हा करण्यास मनाई करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, मालमत्तेचे रक्षण करणे, तसेच शहरात शांतता सुव्यवस्था राखणे इत्यादी प्राथमिक कर्तव्याची जाण पोलीसास असणे जरुरीचे होते त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे होते.पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शस्त्रे हाताळण्याचे ज्ञान असणे जरुरीचे असते. याची माहिती शिफारस क्रमांक ५३ मध्ये केलेली आहे.वरील माहिती नुसार भारतामध्ये पोलीस प्रशिक्षणाची   सुरुवात सन १८६० अठराशे साठ मध्ये पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार सुरू झाली.   

दिनांक बावीस २२ मार्च १८६१ मध्ये इंडियन पोलीस ऍक्ट कायदा मंजूर करण्यात आला.हा पहिला पोलीस कायदा व्हाइसरॉय लॉर्ड चार्ल्स यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रमाणे देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस शाळा सुरू केल्या गेल्या. या शाळेमध्ये अंमलदारास प्रथम मुळाक्षरे, नंतर लिहिणे वाचणे, तसेच काही हत्यारांचे सुद्धा प्रशिक्षण आणि त्याच्या जोडीला कवायत पण घेतली जात होती.मुख्यालयातील शाळेमध्ये पोलिसांनाच प्रशिक्षण दिले जात नव्हते.तर त्या त्याबरोबर पोलिसांच्या मुलांना देखील शिक्षण दिले जात होते.यामुळे सरकार बद्दल व अधिकारी वर्गाविषयी पोलिसांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होत होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस भरतीसाठी मुले वाढू लागली.त्यामुळे पोलीस खात्यामध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले. त्याचा फायदा पोलिस यंत्रणेला झाला.पर्यायाने समाजालाही त्याचा खूप फायदा झाला. सन १९९० मध्ये पोलीस शाळेचे नामकरण करण्यात आले.  त्याला "महाराष्ट्र पोलीस अकॅडमी" असे नाव देण्यात आले.महाराष्ट्रात खंडाळा, दौंड, मरोळ, कडेगाव, तुरची तासगाव,गंडकी, धुळे, नागपूर, जालना, लातूर, या दहा जिल्ह्यांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली गेली. केंद्र सरकारच्या "ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट" यांच्या अखत्यारीत देशातील सर्व पोलिस शाळांची देखरेख केली जाते. 

लेखक : नारायण आव्हाड 

९२७३८५८४५७

संदर्भ : संग्रहालय लायब्ररी

Post a Comment

0 Comments