त्याच्या प्रेमात पडली आणि फसली ....

 त्याच्या प्रेमात पडली आणि फसली .... 

वेब टीम पाटणा : बिहारमधील भागलपूर मध्ये वहिनी आणि दिर  या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे.  दिराच्या प्रेमात वेडी झालेली एक महिला तिच्या सात वर्षाच्या मुला सोबत पोलीस ठाण्यात आली.   तिथे तिने चांगलाच गोंधळ घातला.  एकंदरीत सर्व प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला ही घटना जोगसर  पोलिस ठाण्याच्या  या क्षेत्रात घडली आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचा विवाह दहा वर्षांपूर्वी गोडडा  येथील रहिवासी असलेल्या तरुणा बरोबर झाला होता.  मात्र सहा वर्षांपूर्वी त्याचे रस्ते अपघातात मृत्यू झाला . त्यानंतर ही महिला झारखंडमध्ये राहू लागली .  दरम्यान तिच्या पतीच्या धाकट्या भावाच्या प्रेमात पडली . दोघांच्या भेटी होऊ लागल्या त्याच्यातील जवळीक दिवसेंदिवस वाढू लागली.  ती सांगते की तिने त्याच्या सोबत कुटुंबियांच्या संमतीने विवाह केला आणि एकत्र राहू लागले . महिलेने तिच्या सासरच्यांनी तिच्या दिराचा दुसरा विवाह करण्याची तयारी केली आहे.  तिला याची जशी  माहिती जशी मिळाली  तसे तिने त्वरित झारखंड बिहारला  धाव घेतली.  हि  महिला भागलपूरच्या जोगसर पोलीस ठाण्यात पोहोचली.   आणि  पतीसह जगण्या मरण्याच्या आणा-भाका घेऊ लागली तसेच त्याने पोलिसांना सांगितले की तिच्या पतीचा विवाह दुसरीकडे होता कामा नये.  दरम्यान या महिलेच्या सासरच्या मंडळींनी ही पोलीस ठाण्यात धाव घेतली तसेच आपल्या मुलाचा  विवाह झालं नसल्याच  सांगू लागली.  

त्यामुळे पोलिस ठाण्यात जोरदार राडा झाला सदर महिलेने पोलिसांसमोर अनेकदा आपला दुसरा विवाह झाल्याचे कागद दाखवले.  तसेच कोर्टात जाण्याचा इशारा दिला.  दरम्यान बंटी नावाचा तरुण आता वहिनी सोबत राहण्यासाठी नकार देतोय पोलिसाचा दोघांमध्येही तडजोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे ., मात्र सध्यातरी कुठलाही निर्णय होत नाही.  दरम्यान या महिलेच्या सासूने सांगितले की माझ्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर सोडून माहेरी जाऊन राहिली, तेव्हा तिला आणायला जायचो ती  यायची नाही.

Post a Comment

0 Comments