जीवनात वादळे येतात त्यांना शह देण्यातच जीवनाचे खरे सार : शिल्पाताई दुसुंगे
वेब टीम नगर : जीवन म्हणजे कुसुमांची शय्या नाही. जीवित सागरावर हजारो वादळे येतात ,दुर्दैवाचे भवरे फिरतात त्यांना शह देण्यात जीवनाचे खरे सार आहे. असे प्रतिपादन शिल्पाताई दुसुंगे यांनी केले.
सांस्कृतिक सेल (कॉग्रेस )ची राज्यस्तरीय आढावा बैठक नगर लालटाकी येथील काँग्रेस भवनयेथे पार पडली. यावेळी प्रदेश संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई कदम ,नॅशनल काँग्रेस ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष इक्बाल ,राजेंद्र वाघमारे, जिल्हाध्यक्ष अभिजीत लुनिया, मायकल पालवे, भगत ' महेश भोसले व सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिल्पाताई दुसुंगे म्हणाल्या करोना च्या काळात कलाकारांवर बंदची स्थिती ओढावल्याने अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण सरकारदरबारी कलाकारांना पेन्शन योजना लागू करावी . तसेच कलाकारांसाठी आरोग्यविषयक योजना लागू कराव्यात . कलावंत व कला जगविण्यासाठी साठी शासनाने काही ठोस पावले उचलावीत जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळच येणार नाही व अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू असे त्या यावेळी म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्ष विद्याताई कदम यांनी राज्यभरातील कलावंतांचे मजबूत संघटन करून या कलावंतासाठी सरकारीदरबारात त्यांचे प्रश्न मांडून लढा उभारणार आहे. कलाकारांचे लवकरातलवकर पुनर्वसन कसे होईल यासाठी संघटन प्रयत्नशील आहे.तळागाळातील कलावंतांची यादी तयारकरून सच्चे कलाकार समाजापुढे आणण्याचे कां संघटन करील अशी ग्वाही विध्याताई कदम यांनी दिली.
यावेळी मान्यवर व उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.सूत्रसंचालन महेश भोसले यांनी केले.
0 Comments