वीज वितरणच्या अभियंत्यास मारहाण

वीज वितरणच्या अभियंत्यास मारहाण 

भोर बंधू वर गुन्हा दाखल

वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अकोळनेर वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल भराट यांना दोघा सख्या भावांनी कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकोळनेर येथील दोघा सख्या भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर (दोघे रा. अकोळनेर ता.नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मागील आठवड्यात विजेच्या तारांमधून ठिणग्या पडून अकोळनेर शिवारातील गणेश बेरड यांच्या मालकीचा काढणीला आलेला गहू जळाला होता. 

तेथे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देवुन तारा ऐवजी केबल टाकण्यास सांगितले होते. त्याबाबत कार्यवाही महावितरणचे कर्मचारी करत असताना त्यास बेरड यांच्या शेजारी असलेले भोर यांनी विरोध केला.

त्यानंतर त्यांनी अकोळनेर सबस्टेशन येथे जावुन अभियंता संदीप भराट यांना जाब विचारला. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून शर्टची कॉलर पकडुन मारहाण केली.याबाबत अभियंता भराट यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील विकास सुरेश भोर या आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments