रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…?

रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…?

वेब टीम नगर : रेखा जरे खून प्रकरणातील मास्टरमाइंड बाळबोठे याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅब कडे पाठवून एक वर्ष उलटले तरी ओपन होता नाही हे अनाकलनीय आहे. तरी पोलीस अधीक्षक साहेबांनी याप्रकरणी लक्ष घालावे यासाठी नगराचे ज्येष्ठ विधीज्ञ सुरेश लगड यांनी पोलीस अधीक्षकांनानिवेदन पाठविले असून या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे कि अहमदनगर शहरातील यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे  यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) बाळ बोठे यास आपण आपल्या व सर्व सहकारी पोलिस अधिकारी व आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर अटक करून वेळोवेळी पोलीस कोठडी घेऊन तपास केला आहे. 

बाळ बोठे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.आरोपीस आपण 13 मार्च 2021 हैदराबाद येथून अटक केली होती व तो गुन्हा घडल्यापासून शंभर दिवस फरार होता. बोठे यास या गुन्ह्याच्या कामी अटक होऊन एक वर्ष होऊन गेलं व चार्जशीट  देखील न्यायालयात पाठवलेले असून सदरचा खटला आता अंतिम चौकशीकामी लागणार आहे.पोलीस तपासात आरोपी बाळ कोठे याचा मोबाईल हँडसेट उघड होण्यासाठी आपल्या अधिपत्याखाली तपास यंत्रणेने तो हँडसेट फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून एक वर्षाचा कालावधी झाला.परंतु फॉरेन्सिक लॅब कडून तो मोबाईल हँडसेट ओपन झाला? नाही झाला? याचा बोध होत नाही.  

सदरचा गुन्हा हा अत्यंत संवेद नशील असा आहे समाजहिताच्या विरुद्ध गुन्हा आहे.तो मोबाईल हँडसेट उघडला गेला नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल.  कारण माहिती तंत्रज्ञानात आपला देश एक विकसनशील राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात माहित आहे.अशा या देशात एका मास्टर माइंड गुन्हेगाराचा मोबाईल ओपन होत नाही हे न समजण्या पलीकडे आहे.तंत्रज्ञान किती पुढे गेलेले आहे मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन तो मोबाईल हँडसेट ओपन करणेचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल असे मला वाटते. 

सामाजिक भावनेतून आपणास विनंती की आपण स्वतः बारकाईने लक्ष घालून मारेकरी बाळ बोठे याचा मोबाईल हँडसेट ओपन कसा होईल याचा कसोशीने प्रयत्न करावा अन्यथा एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याचा तपास करूनही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या फॉरेन्सिक लॅब ला मोबाईल पाठवला आहे त्यांना तो ओपन करण्यात यश मिळत नसेल तर फॉरेन्सिक लॅब मधून मोबाईल आणून कंपनीच्या अधिकृत तज्ञांना बोलावून लॉक उघडा एवढेच नव्हे तर मोबाइल कंपनीच्या सर्व डाटा जमा असतो तो बोलावून घेता येतो.  मोबाईल हँडसेट ओपन न झाल्यास उर्वरित तपासाची गती मिळून अनेक महत्व पूर्ण बाबी समोर येतील तरी आपणास विनंती की कायद्याने दिलेल्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर करून हा मोबाईल ओपन करणे यासाठी कसोशीने तात्काळ प्रयत्न करावेत.  एक व्यापक समाजहित लक्षात घेऊन ही विनंती वजा मागणी आपल्याकडे करत आहे याचा गांभीर्याने विचार करावा.  

                                                                                                            ॲँड.सुरेश लगड

Post a Comment

0 Comments