The Kashmir Files वरून प्रकाश राज यांनी लगावला टोला
नोटबंदी, करोना, जीएसटीची आठवण करून देत म्हणाले…
‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. काश्मीरी पंडितांच्या प्रश्नांची मांडणी करणाऱ्या या चित्रपटामुळे देशातलं राजकारण, समाजकारण ढवळून निघालं आहे. या चित्रपटावर कौतुक आणि टीका दोन्हींचाही वर्षाव होत आहे. अभिनेते प्रकाश राज यांनीही या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. त्यांनी काही घटनांची आठवण करून दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गोध्रा हत्याकांड, दिल्ली दंगल, जीएसटी लागू केल्यावेळची आंदोलनं, नोटबंदीच्या वेळची परिस्थिती, कोविडच्या सुरुवातीच्या काळात मजुरांचं होणारं स्थलांतर, गंगेचं प्रदुषण या सगळ्याच्या फोटोंचं कोलाज केलेलं आहे. या ट्वीटमध्ये प्रकाश राज म्हणतात, निर्माते झालेले प्रिय सर्वोच्च अभिनेते, तुम्ही या फाईल्सकडेही लक्ष द्याल का आणि तेही प्रदर्शित कराल का?
प्रकाश राज हे देशातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर सातत्याने भाष्य करत असतात. आपले विचार आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकट करत असतात. त्यांचं हे ट्वीट द कश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरील आहे एवढं तर निश्चित! मात्र त्यांनी ट्वीटमध्ये लगावला टोला कोणासाठी आहे ही बाब मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.
0 Comments