डोक्यात लोखंडी पाईप घालून पत्नीचा खून
वेब टीम नगर : पतीने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ११ वाजता भिंगारमध्ये घडली. मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खूनी सुनील हिरामण वैराळ याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर नवनाथ लोढे (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
सुनील व मंदा हे दोघे पती-पत्नी गंगाधर लोढे यांच्याकडे वैद्य काॅलनी येथील इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होते. सोमवारी राञी ११.१० वाजण्याच्या सुमारास सुनील वैराळ याने काहीतरी कारणाने पत्नी मंदा हिच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारुन गंभीर जखमी करून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळाताच, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बडकाळी यांनी डॉग स्कॉड, फिंगरप्रिन्ट स्कॉडसहीत घटनास्थळी भेट देऊन पंचनाम केला. आरोपी वैराळ याला पोलीसांनी अटक केली आहे.
0 Comments