त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे : गृहमंत्री

त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे : गृहमंत्री 

वेब टीम मुंबई : फोन टॅपिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्यातील प्रकरणात गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून रविवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केली जात आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांच्या गहाळ होण्याच्या प्रकरणाच्या संदर्भात आयटीएस तपासात मुंबई सायबर पोलिस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्षीदार म्हणून चौकशी करत आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“मुंबई सायबर पोलीस ठाण्यात २६ मार्च २०२१ रोजी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गहाळ झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच अज्ञात व्यक्तींविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याच्या दृष्टीकोनातून ज्यांचा याप्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे,” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आहे.

“देवेंद्र फडणवीसांना पहिली नोटीस २१ ऑगस्ट २०२१ रोजी, दुसरी ६ सप्टेंबर २०२१ रोजी, तिसरी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी, चौथी नोटीस नोव्हेंबर २०२१ मध्ये आणि त्यांनतर २ मार्च २०२२ आणि ११ मार्च रोजी नोटीस दिली होती. देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्हच्या संदर्भात सभागृहात माहिती दिली होती. राज्य गुप्तवार्ता विभागातून माहिती बाहेर गेल्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी चौकशी करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांना समन्स नाही तर नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधीच्या नोटीशीमध्ये त्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली होती. पण त्याच्यांकडून उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये काही गैर नाही,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

“एखाद्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करणे हे राजकारणात सुरूच असते. त्याप्रमाणे भाजपा करत आहेत. यामध्ये दंगा करण्यासारखे काही नाही. देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवण्यात आलेली नाही. हे एक वर्ष जुने प्रकरण आहे. एका वर्षापासून त्यांचा जबाब न मिळाल्याने तपास थांबला होता. त्यामुळे जबाब नोंदवण्यात येत आहे. मुंबई पोलीस एसआयडी मधून माहिती बाहेर कशी गेली याचा तपास करत आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे चौकशी सीबीआय करत आहे,” असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments