जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी डॉ. पोखरणा यांना अटक व सुटका

जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी डॉ. पोखरणा यांना अटक  व सुटका 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली.दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे त्यांची तत्काळ मुक्तता करण्यात आली आहे.

६ नोव्हेंबर २०२१  रोजी जिल्हा रूग्णलयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत १४जणांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंता यांना अटक करण्यात आली होती.

सरकारने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीने अहवाल सरकारकडे सादर केला होता. सरकारने या अहवालात डॉ. पोखरणा यांना दोषी धरले आहे. यामुळे त्यांना या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments