बदला घेण्यासाठी सोशल मीडियावरून महिलेची बदनामी

बदला घेण्यासाठी सोशल मीडियावरून महिलेची बदनामी 


वेब टीम नगर : सोशल मीडियाचा चांगला उपयोग होत असला तरी त्याचा दुरउपयोग करणारी मंडळ मोठ्या प्रमाणात आहे.एखाद्या सोबत असलेली दुश्मनीचा बदला घेण्यासाठी जवळची व्यक्तीच सोशल मीडियावरील फोटो, नावाचा गैरवापर करून बनावट अकाऊंटच्या आधारे बदनामी करत आहे.

अशीच एक घटना मागील महिन्यात पारनेर तालुक्यात घडली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता फिर्यादी महिलेच्या गावातीलच अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेच्या फोटोचा गैरवापर करत बदनामी केली होती. 

शनिवारी, 26 मार्च, 2022 रोजी अहमदनगर शहरात राहणार्‍या एका युवतीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या फोटोचा वापर करून त्यांच्या नावे इंस्टाग्रामवर दोन बनावट अकाऊंट तयार करण्यात आले. त्या अकाऊंटवरून फिर्यादीची बदनामी करण्यात आली. 28 फेब्रुवारी, 2022 च्या पूर्वी ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेने शनिवार, 26 मार्च, 2022 रोजी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंंवि.कलम 500 सह आयटी अ‍ॅक्ट 66 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. महिला, मुलींच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे त्यांची बदनामी केली जात आहे.

अलिकडच्या काळात येथील सायबर पोलीस ठाण्यात अशा तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. बदनामीसाठी जवळची व्यक्ती किंवा सोशल मीडियावर फ्रेंड असलेल्या व्यक्तींकडून अशी बदनामी केली जात असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments