रशियन सैनिकांनी केले युक्रेनियन महिलांवर बलात्कार

रशियन सैनिकांनी केले युक्रेनियन महिलांवर बलात्कार 

एका महिलेच्या मुलांसमोरच केला वारंवार बलात्कार 

वेब टीम कीव : युक्रेनमधील महिला खासदाराने रशियन लष्कराकडून युक्रेनमधील महिलांवर बलात्कार केले जात असल्याचा धक्कादायक आरोप केलाय. युक्रेनवर आक्रम करणारे रशियन सैनिक युक्रेनमधील महिलांवर बलात्कार करण्याबरोबरच त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत असं या महिला खासदाराने म्हटलं आहे. मात्र आपण यासंदर्भात शांत बसणार नसून आवाज उठवणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

युक्रेनच्या महिला खासदार मारिया मेझेन्टेवा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये किव्ह शहराच्या उत्तरेकडे असणाऱ्या ब्रोव्हरी उपनगरामधील घटनेचा संदर्भात देत हा आरोप केलाय. या ठिकाणी एका महिलेवर तिच्या मुलासमोर बलात्कार करण्यात आला. बुधवारी प्रॉसिक्युटर जनरल इरिना वेनेडिक्टोव्हा यांनी या प्रकरणाची चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. या प्रकरणामध्ये युक्रेनने संबंधित रशियन लष्करी अधिकाऱ्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं असल्याची माहिती रशियाला दिलीय.


स्काय न्यूजशी बोलताना मारिया मेझेन्टेवा यांनी, “या प्रकरणाची सध्या फार चर्चा होत  आहे.  कारण या प्रकरणाची नोंद झाली असून या प्रकरणात चौकशी सुरु झालीय. आम्ही यासंदर्भात सविस्तर तपास अद्याप केलेला नाही. मात्र या उपनगरामध्ये घरांमध्ये घुसून सर्वसामान्यांवर  गोळ्या झाडण्यात आल्या,” असं म्हटलंय.

“या मृत व्यक्तीच्या पत्नीवर तिच्या अल्पवयीन मुलांसमोरच अनेकदा बलात्कार करण्यात आला,” असा आरोपही मारिया मेझेन्टेवा यांनी केलाय. युरोपीयन काऊन्सिलमधील युक्रेनच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व मारिया करतात. त्यांनी या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केलीय. बलात्कार आणि लैंगिक शोषण हे युद्ध गुन्ह्यांमध्ये येतं आणि हे आंतराराष्ट्रीय मानवी कायद्यांचं उल्लंघन आहे, असंही मारिया म्हणाल्यात.

अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली नाही. या अशा प्रकरणांनंतर पिडितांना कशाप्रकारे मदत करावी यासाठी युनायडेट किंग्डम मदतीचा हात पुढे करेल अशी अपेक्षा मारिया यांनी व्यक्त केलीय. “अशाप्रकारच्या अत्याचारांना युद्धादरम्यान अनेक महिला बळी पडल्या आहेत. यापैकी एकच प्रकरण समोर आलं आहे. अशाप्रकारची अनेक प्रकरण असतील असं आम्हाला वाटतं. या प्रकरणांसंदर्भात पिडितांनी बोलण्याची तयारी दाखवली तर ती समोर येतील,” असं मारिया म्हणाल्यात.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरोधातील युद्धाची घोषणा केली असून अनेक शहरांवर हल्ले केले जात आहेत. यामध्ये मोठी जिवतीहानी झालीय.


Post a Comment

0 Comments