अहमदनगर जिल्ह्याचे पावित्र्य

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : अहमदनगर जिल्ह्याचे पावित्र्य

श्री सुरेश जोशी लिखित दर्शन या पुस्तकात याची माहिती दिली आहे.  निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी तसेच नेवासा येथे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.  ज्ञानेश्वरी चे जन्म ठिकाण म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

कीर्तनकार महाराज सांगतात की , नकळत चुकून आपल्या हातून काही कृत्य घडले तर नामस्मरणाने त्यापासून मुक्ती मिळते.  एखाद्या वेळेस आपल्या हातून मुद्दाम काही पातक घडते त्यासाठी भजन-कीर्तन श्रवणाने त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते.  आपण एखाद्या ने खूप पाप केले असेल तर त्याला म्हणतो याचा आता घडा भरला आहे.  अशा व्यक्तीने  महाराज म्हणतात "प्रयागराज" या ठिकाणी तीन नद्यांच्या संगमावर स्नान केले असता त्यापासून त्या व्यक्तीला  पापातून मुक्ती मिळते, कारण त्या ठिकाणी गंगा,यमुना, जमुना या तीन नद्यांचा एकमेकींना मिसळतात त्या ठिकाणाला खूप पवित्र मानले जाते.

त्याच तोडीचे पावित्र्याचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे.  या ठिकाणाला कायगाव टोक वा प्रवरासंगम असे संबोधतात.  या ठिकाणी मुळा, प्रवरा ,गोदावरी या तीन नद्यांचा संगम होतो. पुढे गोदावरी नावाने तिचा मराठवाड्यात प्रवेश होतो. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मौजे चोराचीवाडी या गावाच्या पूर्वेला सरस्वती नदी वाहते.  त्या ठिकाणी मौजे घोडेगाव वरून देव नदी येते.  या दोन नद्यांचा संगम होतो.  पुढे सरस्वती नावानेही नदी पाच-सहा किलोमीटर वाहते व मौजे पेडगाव याठिकाणी ही नदी भीमा नदीला मिळते.  म्हणजे या ठिकाणी ही तीन नद्या एकमेकींमध्ये विलीन होतात. पुढे भीमा नदी पंढरपूरला चंद्रभागा नावाने प्रवाहित होते.  थोडक्यात सांगायचे झाले तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तीन नद्यांच्या संगमाचे  ठिकाण आहे. तर दक्षिण भागांमध्ये तीन नद्यांचा संगमाचे ठिकाण आहे.  परंतु अहमदनगर जिल्ह्यातील समाज तिन नद्यांच्या संगमाचे ठिकाण शोधत-शोधत "प्रयागराज"येथे जातो व तेथे पवित्र स्नान करून आल्याचे फुशारकीने सांगतो.  म्हणतात ना पिकते तिथे विकत नाही हेच खरे . 

लेखक :नारायण आव्हाड 

मोबाईल नंबर ९८८१९६३६०३

संदर्भ :  ऐतिहासिक वस्तू संग्रहालय ग्रंथालय, अहमदनगर

Post a Comment

0 Comments