मा.मंत्री शंकरराव कोल्हे यांचे दु:खद निधन …

मा.मंत्री शंकरराव कोल्हे यांचे  दु:खद निधन …

 


वेब टीम कोपरगाव: सहकारातील ज्येष्ठ नेते आणि मा.मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.सहकारातील प्रमुख व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

        पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली. सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.त्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोनं केलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे.

Post a Comment

0 Comments