हत्या करून स्वतः देखील केली आत्महत्या

हत्या करून स्वतः देखील केली आत्महत्या 

वेब टीम नागपूर : एका व्यक्तीने तिच्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची हत्याकरून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर  शहरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत असलेल्या राजीव नगर  येथे घडली आहे . या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार मृतक व्यक्तीचं नाव विलास गवतेआहे. विलासने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. हि घटना नागपूरमधील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात घडली आहे. कौटुंबिक वादातून विलास गवते याने पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री संपूर्ण गवते कुटुंब झोपलेले होते. त्यावेळी विलास गवते याने आपली पत्नी रंजना आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमकं कारण सुद्धा समोर येईल. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments