दुचाकी चोर पकडला ७ दुचाक्या जप्त

दुचाकी चोर पकडला ७ दुचाक्या जप्त 

वेब टीम नगर : शहरातील तोफखाना पोलीसांनी दुचाकी चोर पकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्याची कारवाई तोफखाना पोलीसांनी केली आहे. विकास खरपुडे, (रा. बुरुडगावरोड, चोरेमळा, श्रीरामनगर, अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नाव आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि जे.सी. गडकरी यांच्या सूचनेनुसार पोउपनि समाधान सोळके, पोहेको दत्तात्रय अपे, पोना अधिना पाकचौरे, मोना वसीम पठाण, पोना अहमद इनामदार, पोना शैलेश गोमसाळे, पोकाॅ शिरीष तरटे, पोकाॅ सतीष त्रिभुवण, पोकॉ सचिन जगताप, पोकॉ धिरन खंडागळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. ३ मार्च २०२२ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११५३/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांची दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतःचे फायद्याकरीता चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांचे सांगणेप्रमाणे फिर्याद नोंदविण्यात आलेली होती.

दि. ९ मार्च २०२२ रोजी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी व मोबाईल चोरी करणा-यांचा शोध घेत असताना गोपनीय बातमी मिळाली. तोफखाना पोलीस ठाणे हददीतील पाईपलाईन रोड येथून चोरीस गेलेली मोपेड दुचाकी ही विकास खरपुडे, (रा. बुरुडगावरोड, चोरेमळा, श्रीरामनगर, अहमदनगर) याने चोरलेली आहे, अशी माहिती मिळताच तात्काळ तोफखाना पोलीस त्याचे राहते घरी जावून शोध घेतला. दरम्यान तो घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पाईपलाईनरोड येथून चोरी केलेल्या मोपेड दुचाकीबाबत विचारपुस केली. त्याने दि. ३ मार्च २०२२ रोजी रात्री देवकीनंदन अपार्टमेंट पाईपलाईन रोड येथून सिल्क रंगाची ॲक्सेस १२५ मोपेड दुचाकी चोरी केलेबाबत सांगितले. 

त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विकास उर्फ विकी दिलीप खरपुडे (वय २४ , रा. बुरुडगावरोड, चौरेमळा, श्रीरामनगर, अहमदनगर) असे सांगितले. दुचाकी चोरीचे गुन्हयाबाबत अधिक माहितीसाठी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने अहमदनगर शहरातून व पुणे जिल्हयातून विविध ठिकाणांवरुन असे ब-याच दुचाकी चोरी केल्या असल्याची कबुली दिली. आरोपी कडून ७ चोरीचे दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास पोहेकाॅ शाकील लतीफ सय्यद हे करत आहेत.(फोटो-७ दुचाक्या )

Post a Comment

0 Comments