ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नये
या मागणीसाठी जनमोर्चाचा शिवाजी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन
वेब टीम नगर : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नये या मागणीसाठी ओबीसी, व्हिजे-एनटी जनमोर्चाच्यावतीने जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली एस.टी.स्टॅण्ड चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ओ.बी.सी. आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास राजकीय प्रतिनिधित्वापासून ओबीसी समाज वंचित राहणार असल्याने हा तमाम समाजावरील अन्याय ठरणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी असून, निवडणुक आयोगापर्यंत ही आमची मागणी पोहचवावी, असे श्री.सानप यांनी आंदोलनकांसमोर बोलतांना सांगितले.
या आंदोलनात जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, डॉ.सुदर्शन गोरे, राजू पडोळे, संतोष बडे, रजनी ताठे, वनिता बिडवे, छाया नवले, आशा पालवे, सुशिला साहनी, महेश राऊत, अलकानंदा पालवे, संदिप बडे, मिनानाथ बडे, सरफरोज जहागिरदार, राजू शिंदे केबलवाले, शरद मुर्तडक, बाळासाहेब साळवे, नईम शेख, गोरक्ष गावडे, प्रमोद सानप, कुंदन घुले, संजय सागावकर, संजय आव्हाड, विनोद पुंड, डॉ.उपाध्ये, कैलास दळवी, प्राचार्य बाळासाहेब वाघचौरे, कैलास चौरे, श्रीकांत मांढरे आदि सहभागी झाले होते.
ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणाांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनानंतर दुपारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येवू नये, ओबीसी आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत ओबीसी प्रवर्गासाठी अरक्षित असणार्या जागा या खुल्या प्रवर्गातील म्हणून जाहीर करण्यात येवू नये. जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसीचे स्थानिक स्वराज संस्थेतील गेलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे. ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के स्कॉलरशिप मिळावी, मागिल दोन वर्षांपासून पूर्व मॅट्रिक स्कॉलरशीप मिळत नाही, ही स्कॉलरशीप विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरु करावे. वर्ग 3 व 4 ची नोकर भरती सुरु करावी, केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरु करण्यात यावे, एस.सी. व एस.टी. शेतकर्यांप्रमाणे ओबीसी शेतकर्यांना शासकीय योजना त्वरीत सुरु करावी, ओबीसीचा इम्पिरिकल डाटा सादर करुनच ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका घ्याव्यात आदि मागण्यांचा समावेश करण्यात आला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आपापल्या अधिकारात येणार्या मागण्यांचा विचार करावा. अन्यथा जनमोर्चा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा श्री.भुजबळ व श्री.भिंगारे यांनी यावेळी दिला.
निवेदननाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता, ना. छगन भुजबळ, ना.विजय वडेट्टीवार, बाळासाहेब सानप आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.
0 Comments