वेल्डर चा मोटार अपघातात मृत्यू

'वेल्डर' चा मोटार अपघातात मृत्यू 

वारसांना 36 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर 

वेब टीम नगर : मौजे रांजणगाव मशीद ता.पारनेर जिल्हा अहमदनगर येथील एक तरुण उद्योजक शांताराम तुळशीराम गाढवे यांचा मोटर अपघाताने दिनांक 28 ऑगस्ट 2015 रोजी मृत्यू झाल्याने त्याच्या वारसाच्या वतीने मोटार अपघात नुकसान भरपाई क्लेम अहमदनगर येथील न्यायालयात दाखल केलेला होता.त्याचा नुकताच निकाल लागून वारसांना व्याजासह 36 लाख रुपये मंजूर करण्याचा आदेश मोटार अपघाताचे न्यायाधीश श्रीमती पी एन राव मॅडम यांनी दिला.या प्रकरणात वारसा तर्फे अहमदनगर येथील जेष्ठ विधिज्ञ व विशेष सरकारी वकील ॲड सुरेश लगड व ॲड बाबासाहेब कर्डिले यांनी काम पाहिले. 

अपघातग्रस्त वाहनाचे एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे ॲड सिद्धेश मेहर यांनी काम पाहिले. 

 याबाबतची सविस्तर माहिती अशी की मयत शांताराम हा दिनांक 21 ऑगस्ट 2015 रोजी मोटरसायकलवर पाठीमागे बसून कोळगाव होऊन रांजणगाव मशीद कडे जात असताना विसापूर परिसरात टेम्पो क्रमांक एम एच १६ ए इ ६५०४ हा विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने येऊन मोटरसायकल चालक राजाराम तुळशीराम गाढवे व पाठीमागे बसलेला मयत शांताराम यांना जोराची धडक दिल्याने अपघात होऊन पुढे उपचार चालू असताना शांताराम दिनांक 27 ऑगस्ट 2015 रोजी मयत झाला.बेलवंडी पोलिसांनी अपघातातील टेम्पो चालकाविरुद्ध मोटार अपघातास कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल करून तपास करून  आरोप पत्र देखील न्यायालयात दाखल केले होते.वारसांच्या वतीने (मयताची पत्नी सीमा,मुलगी अस्मिता व प्रियांका तसेच मयताचे आई-वडील तुळशीराम दगडू गाढवे व सौ नंदा तुळशीराम गाढवे) यांनी अपघातग्रस्त टेम्पो से मालक व विमा कंपनी विरुद्ध रक्कम रुपये 40 लाख 47 हजार मिळण्यासाठी दावा दाखल केलेला होता.  सदर केस मध्ये मयत हा वेल्डिंग चा व्यवसाय करीत होता.कुटुंब प्रमुख होता.सर्व वारसांना सांभाळत होता.असा युक्तिवाद ॲड लगड यांनी केलेला होता.तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने वारसांना एकंदरीत रक्कम रुपये 36 लाख व्याजासह मंजूर केले. 

विशेष म्हणजे विमा कंपनी चे वकील सिद्धेश मेहर यांनी अल्प कालावधीत मोटार अपघात नुकसान भरपाई चा चेक वारसांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.ए.सय्यद, न्यायमूर्ती रवींद्र घुगे,न्यायमूर्ति संजय पेहेरे व जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी वारसांचे वकील ॲड.सुरेश लगड व विमा कंपनीचे सिद्धेश मेहेर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments