गोव्यातून आणलेली विदेशी दारू घोडेगावात जप्त
वेब टीम नेवासा : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे आज जप्त करण्यात आला.दामू पुंजाराम जाधव (वय 42 वर्ष) व रामू पुंजाराम जाधव (वय ४५), राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव परिसर, अहमदनगर येथून सदर साठा जप्त करण्यात आला
परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने पुढील तपास सुरु आहे.
0 Comments