हॅल्लो, मी कस्टमर केअरमधून बोलतोय.... !!!!!

हॅल्लो,  मी कस्टमर केअरमधून बोलतोय.... !!!!!

असे सांगून सव्वा दोन लाखास गंडविले  

वेब टीम नगर : एका सायबर गुन्हेगार भामट्याने मोबाईलमध्ये ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून नगरच्या एका गुरुजीला सव्वादोन  लाख रुपयांचा चुना लावल्याची घटना नगरमध्ये घडली आहे.संदीप रामभाऊ आंधळे (रा. पाईपलाईनरोड साईदीपनगर) असे त्या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संदीप आंधळे यांना ९१८९२६१६४४३६ या नंबरवरून फोन आला होता.

एसबीआय कस्टमर केअरमधून बोलतोय, असे सांगून समोरच्या व्यक्तीने आंधळे यांचा विश्वास संपादन करून त्या व्यक्तीने आंधळे यांना मोबाईलमध्ये ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. आंधळे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड केले. त्या व्यक्तीने आंधळे यांना अ‍ॅप मध्ये काही माहिती भरण्यास सांगितली. आंधळे यांनी माहिती भरली व नंतर मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांनी समोरच्या व्यक्तीला सांगितला.

त्यानंतर त्या व्यक्तीने आंधळे यांना त्यांच्या बँक खात्याचा युझरआयडी व पासवर्ड टाकण्यास सांगितले. तसेच एटीएम कार्डची माहिती भरण्यास सांगितले. 

आंधळे यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती अ‍ॅप वर भरली. त्या व्यक्तीकडे आंधळे यांच्या मोबाईलचा ऍक्सेस गेल्यामुळे त्याच्याकडे आंधळे यांच्या बँक खात्याची सर्व माहिती गेली होती.त्या माहितीच्या आधारे आंधळे यांच्या खात्यातील दोन लाख २३ हजार ४९९ रूपये त्या व्यक्तीने काढून घेतले. आपली फसवणूक झाली असल्याची बाब आंधळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments