२८ वर्षात जप्त केलेला ९९७ किलो गांजा केला नष्ट

२८ वर्षात जप्त केलेला ९९७ किलो गांजा केला नष्ट

वेब टीम नगर  : नगर जिल्ह्यात २८ वर्षात अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात जप्त केलेला एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजाचा जिल्हा पोलिस दलाने रांजणगाव एमआयडीसी मध्ये शनिवारी (दि.२६) नाश केला आहे.

न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात सन १९९४ ते २०१४ पावेतो ३२ गुन्ह्यात एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.

नमुद गुन्ह्यांचा मुदतीत तपास पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्याची न्यायालयात नियमित सुनावणी होवुन न्यायालयीन प्रक्रियापुर्ण करुन न्यायालयाने मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश दिले होते. 

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेशान्वये जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचे अध्यक्षते खाली अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपअधिक्षक (गृह) मेघश्याम डांगे,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार स.फौ.विष्णु घोडेचोर, पोहेकॉ भाऊसाहेब कुरुंद, पोहेकॉ सखाराम मोटे, पोहेकॉ शरद बुधवंत, पोहेकॉ देवेंद्र शेलार,पोना शंकर चौधरी, पोकॉ जयराम जंगले, पोहेकॉ अर्जुन बडे व पोहेकॉ बबन बेरड अशांनी नगर जिल्हयातील सन १९९४ ते २०१४ पावेतो ३२ गुन्ह्यात एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजा असा प्रदिर्घ काळापासुन नाश करणेसाठी प्रलंबित असलेला अंमली पदार्थ नाश करण्याची योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन शनिवारी (दि.२६) रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीत नाश केला आहे.

Post a Comment

0 Comments