मित्राला सोडवायला निघालेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू

मित्राला सोडवायला निघालेल्या तीन  युवकांचा अपघाती मृत्यू 

वेब टीम श्रीगोंदा : आपल्या मित्राला सोडवायला निघालेल्या तीन युवक मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि१३ रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा काष्टी रोडवर हॉटेल अनन्या जवळ घडली आहे

राहुल सुरेश आळेकर वय २२,केशव सायकर वय २२,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय१८ अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

अपघात घडल्यानंतर हॉटेल अनन्या चे मालक महेश शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त तरुणांना त्यांच्या वाहनातून बाहेर काढत मदतीची सूत्रे फिरवत आंब्युलन्स बोलावली,परंतु यातील केशव व आकाश या दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला होता राहुल ला उपचारासाठी श्रीगोंदयात आणले परंतु तो पर्यत त्याची प्राणज्योत मालवली होती,मिळालेल्या माहितीनुसार राहुल व आकाश हे केशव याला काष्टी येथे सोडवण्यासाठी मित्राची स्विफ्ट कार घेऊन निघाले होते त्यावेळी रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरच्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला.

Post a Comment

0 Comments