शिर्डीत एका परराज्यातील महिलेवर अत्याचार

शिर्डीत एका परराज्यातील महिलेवर अत्याचार

वेब टीम राहता : जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत एका परराज्यातील महिलेवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर येथील वाघ वस्ती येथे रविराज जाधव याने जबरदस्तीने अत्याचार केले.व मोबाईलमध्ये याचे छायाचित्रण करून तिला वारंवार त्रास दिला. असून पिडीत महिला एका हॉटेल मध्ये काम करत असताना जाधव हा दर महिन्याला पीडित महिलेकडून दहा हजार रुपये घेवुन परत दिले नाही.

तसेच सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यास कंटाळुन पिडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परराज्यातील महिलेला वेठीस धरून अत्याचार केल्यामुळे महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत. . रविराज गिरिधर जाधव (वय ३९) असे आरोपीचे नाव असून शिर्डी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Post a Comment

0 Comments