नागपुरात काँग्रेस , भाजपा कार्यकर्ते समोरासमोर

नागपुरात काँग्रेस , भाजपा कार्यकर्ते समोरासमोर 

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात 

वेब टीम नागपूर : दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामुळे कोरोना पसरल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या. त्यानंतर आज नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थाना  समोर जमले असतांना त्यांचा प्रतिकार करण्यासाठी भाजप चे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर जमले होते त्यात भारतीय जनता पक्ष कडून इट का जवाब पत्थर से देंगे अश्या घोषणा देण्यात आल्या त्यावर प्रत्युत्तरादाखल आम्ही त्याचे पेक्षा दगड मारू असे काँग्रेस आमदार कडून सांगण्यात आल्यानंतर परिस्थिती चिघळली. 

बराच वेळ चाललेल्या घोषणा बाजीमुळे दोन्ही गटात धुसमश्चक्रि होते कि काय असे चित्र पाहायला मिळाले.त्यानंतर पोलिसांनीं दोन्ही पक्षाच्या कारकर्त्यांचे जत्थे हटवत अटकसत्र सुरु केल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.   Post a Comment

0 Comments