शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या

शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या

आधी तीन गोळ्या घातल्यानंतर कुऱ्हाडीने केले वार

वेब टीम यवतमाळ : जिल्ह्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या करण्यात आलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिरवे यांची राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी हत्या केलीय. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर कुऱ्हाडीने डिवरे यांच्यावर वार केले.

हा धक्कादायक घटनाक्रम गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडलाय. ४० वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी परसली आणि त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली.

डिवरे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डिवरे यांचा रुग्णालयामध्ये आणण्याआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

डिवरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र शासकीय रुग्णालयाबरोबरच डिवरेंच्या घराबाहेर रात्रीपासूनच समर्थकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. भांबराजा परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Post a Comment

0 Comments