रेल्वेने आज ३८० गाड्या केल्या रद्द, प्रवासापूर्वी चेक करा लिस्ट

रेल्वेने आज ३८० गाड्या केल्या रद्द, प्रवासापूर्वी चेक करा लिस्ट

आज १४ फेब्रुवारीला ३८० ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत

याशिवाय १७ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

वेब टीम नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) आजही मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या आहेत. सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी ३८० ट्रेन पूर्णपणे रद्द (Train Cancelled) करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज १७ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पेशल, पॅसेंजर, मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचा समावेश आहे. तुम्हीही आज कुठे जाण्याचा प्लॅन बनवला असेल, तर तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा.

कुठल्या ट्रेन रद्द झाल्या?

आज रद्द करण्यात आलेल्या बहुतांश गाड्या या बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतील आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आज कुठेतरी ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ट्रेन रद्द झाली आहे की नाही हे नक्की जाणून घ्या.

१. सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जा.

२. आता तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या पॅनलवर Exceptional Trains लिहिलेले दिसेल.

३. जिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यावर तुमच्याकडे अनेक पर्याय असतील, त्यापैकी एक रद्द केलेल्या ट्रेनचा (Cancelled Trains) पर्याय असेल.

४. रद्द केलेल्या गाड्यांची यादी बघायची असेल तर त्यावर क्लिक करा.

५. गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी, पूर्ण (Fully) किंवा आंशिक (Partially) पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments