गावठी कट्टा घेवून गेला अन्.......

 गावठी कट्टा घेवून गेला अन्....... 

 पोलिसांच्या जाळ्यात अडकला

वेब टीम नगर  : गावठी कट्टा घेवून महिलेला धमकी देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसेसह अटक केली आहे.नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. केडगाव उपनगरात राहणार्‍या वंदना अशोक भिंगारदिवे या रविवारी सायंकाळी घरामध्ये स्वयंपाक करत असताना नितीन शेलार त्यांच्या घरात घुसला.

तुमच्या मुलाने आमच्या पुतणीला पळवून नेवून लग्न केले आहे, त्यामुळे आमची बदनामी झाली आहे, असे म्हणत शेलार याने वंदना भिंगारदिवे यांना गावठी कट्टा दाखविला.वंदना यांच्यासह त्यांचा मुलगा अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची माहिती अक्षय याने 112 नंबरवर फोन करून पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत नितीन शेलार याला ताब्यात घेतले.

त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments