यशस्वीतेचा सुवर्णमंत्र पुस्तक युवकांना यश मिळण्यासाठी मार्गदर्शक : प्रा.शिरीष मोडक

यशस्वितेचा सुवर्णमंत्र पुस्तक युवकांना यश मिळण्यासाठी मार्गदर्शक : प्रा.शिरीष मोडक  

वेब टीम नगर :  सध्याच्या भरकटलेल्या युवा पिढीला मार्गदर्शनाची खूप गरज आहे. पुस्तकांच्या माध्यमातून युवकांना चांगले मार्गदर्शन होवू शकते. यशस्वी उद्दोजक नवनाथ धुमाळ यांचे यशस्वीतेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक यश मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. असे उपयुक्त पुस्तक लेखक नवनाथ धुमाळ यांनी जिल्हा वाचनालयास भेट देवून चांगला उपक्रम राबवला आहे. या पुस्तकाच्या आणखीन औवृत्या निघाव्यात या सदिच्छा. जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून हे पुस्तक जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.

१८३ वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या जिल्हा वाचनालयास नगरचे उद्दोजक व लेखक नवनाथ धुमाळ यांनी लिहिलेले यशस्वीतेचा सुवर्णमंत्र या पुस्तकांचा संच भेट दिला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानाहून प्रा.शिरीष मोडक बोलत होते. यावेळी लेखिका मेघा काळे, लेखक व विचारवंत सुहास मुळे, ज्येष्ठ विधीज्ञ भीमराज काकड, अशोक सरनाईक, जिल्हा वाचनालयाचे पदाधिकारी राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर, दिलीप पांढरे, कवी चंद्रकांत पालवे, श्री.आढाव, श्री.कुलकर्णी, श्री.देशमुख, श्री.वाघ आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.

यावेळी नवनाथ धुमाळ म्हणाले, जगात यशस्वी नागरिक खूप कमी आहेत. सर्वसामान्य नागरिक जीवनात यशस्वी व्हावेत, छोटे मोठे उद्दोजक व्हावे, यासाठी चांगले मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने मी यशस्वीतेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर चांगला प्रतिसाद या मिळाला आहे. नगर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा वाचनालयाचे नावलौकिक आहे. अशा प्रतिष्ठीत संस्थेच्या पुस्तकांच्या वैभवात छोटीशी भर माझ्या या पुस्तकाने पडणार आहे, असे सांगून त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठीचे विविध कानमंत्र दिले.

सुहास मुळे म्हणाले, सर्व सामान्यांना व्यक्त होण्यासाठी पुस्तक हे शाश्वत मध्यम आहे. पण सध्या लोकं वाचतच नाहीत. सोशल मिडिया वरील वाचणे हा टाईमपास आहे.  पुस्तके वाचणे हा जगातील सर्वात श्रीमंत छंद आहे. त्यामुळे मराठी राज भाषा दिनानिमित्त जास्तीतजास्त पुस्तक वाचनास सुरवात करण्याचे आवाहन मी करत आहे. नवनाथ धुमाळ यांचे विचार खूप प्रभावी आहेत. त्यांनी पुस्कातून मांडलेले विचार मार्गदर्शक आहेत.

यावेळी अॅड.भीमराज काकड यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात अशोक सरनाईक म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातून वर येत नवनाथ धुमाळ आज यशस्वी उद्दोजक झाले आहेत. त्यांच्या प्रमाणेच इतरांना ही प्रेरणा या पुस्तकातून मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments