नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी

नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी

; मनसैनिकांनी धु धु धुतला

वेब टीम नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथील संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला बेदम चोप दिला. याबाबत अधिक माहिती अशी, नेरुळ येथील एका मोठ्या संस्थेत नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता.

या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. प्रेम चव्हाण असं या नराधमाचे नाव आहे.या प्रेम चव्हाण बीआरसीमध्ये हाऊस किपिंगचे काम करतो. या नराधमाविरोधात एका महिलेने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली.

या नराधमाने पीडित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकून माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख देण्याची मागणी केली.

तसंच या पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉजमध्ये बोलवले. यावेळी हा नराधम लॉजमध्ये आला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहाथ पकडले.त्याला लॉजमधून बाहेर आणले आणि चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments