बाळ बोठे याला विनयभंग गुन्ह्यात जामीन नाकारला

बाळ बोठे याला विनयभंग गुन्ह्यात जामीन नाकारला 

वेब टीम नगर : बहुचर्चित रेखा जर हत्याकांडातील एक आरोपी बाळ बोठे याला अन्य एका गुन्ह्यात  कलम ३५४ (विनयभंग) जामीन नाकारण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश क्र.२ न्यायाधीश देशपांडे मॅडम यांच्याकडे २९-११-२०२१ रोजी जामीन अर्ज बाळ बोठे याने दाखल केला होता. या प्रकरणात चार्जशीट दाखल झाले असून तपास पूर्ण झाला असल्याने या प्रकरणात बाळ बोठे याला जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद आरोपीचे वकील तवले यांनी केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी आरोपी हा अन्य एका प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर दीर्घकाळ पसार होता. या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यास आरोपी पुन्हा पसार होण्याची भीती आहे. र्तसेच साक्षीदारांवरही दबाव आणण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकील सतीश पाटील व रेखा जरे प्रकरणातील मूळ फिर्यादीचे वकील ॲड.सचिन पटेकर यांनी मांडल्याने न्यायाधिशांनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून आरोपी पुन्हा पसार होईल. तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण नोंदवून जिल्हा व सत्र न्यायालयाने बाळ बोटेच याला जामीन नाकारला आहे.Post a Comment

0 Comments