सागर भिंगारदिवेच्या जामिन अर्जावर २२ फेब्रुवारीला निर्णय

सागर भिंगारदिवेच्या जामिन अर्जावर २२ फेब्रुवारीला निर्णय 

वेब टीम नगर : जातेगाव घाटातील रेखा जरे हत्या कंद प्रकरणातील क्र.५ चा आरोपी सागर भिंगारदिवे याच्या जामीन अर्जावरील निर्णय दिनांक २२ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने राखून ठेवला आहे. 

बहूचर्चित रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी जातेगाव घाटात गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जरे यांच्या मुलाने एका मारेकऱ्याचा फोटो टिपल्याने गुन्हेगार सापडण्यास मदत झाली. त्यातच सागर भिंगारदिवे यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला ५ क्रमांकाचा आरोपी करण्यात आले. त्याने केलेल्या जामिनाच्या अर्जावर वादी आणि आरोपी यांच्या वतीने युक्तिवादही  न्यायमूर्ती कुरतडीकर यांच्या पिठासमोर करण्यात आला. पोलिसांच्या वतीने यादव पाटील यांनी युक्तिवाद केला त्यांना सहाय्यक म्हणून ॲड. सचिन पटेकर यांनी काम पहिले तर आरोपीचे वकील ॲड.विपुल दूसिंग यांनी काम पहिले. 

दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २२ फेब्रुवारी पर्यंत निकाल राखून ठेवला आहे.      



Post a Comment

0 Comments