दार तोडून रोकड ,दागिने चोरले

दार तोडून रोकड ,दागिने चोरले 

वेब टीम नगर : घराच्या आतिल बाजूची कडीकोयंडा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सामानांची उचकापाचक करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने  असा 55 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

नगर तालुक्यातील हिवरेझरे शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय दशरथ टकले (वय 42 रा. हिवरेझरे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मंगळवारी रात्री कुटूंबासह घरामध्ये झोपलेले होते. दरवाजाची कडी आतून बंद होती.बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व दागिने  चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक फौजदार लबडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments