वीज चोरी करणाऱ्यानंवर गुन्हा दाखल
वेब टीम नगर : वीज मीटरच्या मागील बाजूला छिद्र पाडून वीज चोरी करणार्या दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अति.कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. पी. पी. गांधी आणि रफिक खुदाबक्ष सय्यद (रा. बाबा बंगाली, मंगलगेट, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अभियंता सावंत यांनी त्यांच्या पथकातील कनिष्ठ अभियंता नरेंद्र नावकार, तंत्रज्ञ यशवंत वेदपाठक यांच्यासह मंगलगेट परिसरातील बाबा बंगाली येथील अॅक्व्वा वॉटर प्लॅटला भेट दिली. पी. पी. गांधी यांच्या मालकीचे व रफिक सुदाबक्ष सय्यद हे वापरत असलेल्या वीज मीटरची तपासणी भरारी पथकाने केली. वीज मीटरच्या मागील बाजूला एक छिद्र पाडलेले दिसले.
वीज मीटरची नगरमधील वीज मीटर चाचणी कक्षात तपासणी केली असता त्यामध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले.गांधी व सय्यद यांनी वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये कमी प्रमाणात होईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून वीज चोरी केली हे स्पष्ट झाल्याने वर्षभरात महावितरण कंपनीचे एकुण तीन हजार 477 युनिटची वीज चोरी केली असून त्यापोटी एक लाख रूपये भरण्याचे आदेश महावितरणणे दिले होते.
गांधी व सय्यद यांनी पैसे न भरल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments