ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाची आत्महत्या

ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

वेब टीम बुलढाणा :  शहरातील सुटाळपुरा भागातील रहिवासी आदिनाथ गडकर या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनामागील कारणाचा धक्कादायक खुलासा समोर आलाय. एक फेब्रुवारी रोजी या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर सात दिवसांनी कारणाचा खुलासा झालाय. या प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली. मात्र आता या आत्महत्येमागील खरं कारण समोर आलंय.

    मागील सात दिवसांपासून सुरु असणाऱ्या तपासादरम्यान पोलिसांनी आदिनाथच्या आत्महत्येचे गूढ उकललं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अदिनाथचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधाच्या मुद्द्यावरुन ती आदिनाथला ब्लॅकमेल करून त्याच्याकडे सतत पैसे मागायची त्यामुळे वारंवार होणाऱ्या पैशाच्या या मागणीला आदिनाथ कंटाळला होता. अखेर याच तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली असे आदिनाथच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार मुलाचे वडील नरेंद्र गडकर यांनी दिली असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशींनी दिलाय.

आदिनाथच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आदिनाथचे एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांचे अनेक गोपनीय फोटो तिच्याजवळ होते. त्यामुळे ती वेळोवेळी आदिनाथकडे पैशांची मागणी करत होती व ब्लॅकमेल करीत होती. तिच्या सततच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी आदिनाथने एक फेब्रुवारी रोजी घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आदिनाथने आत्महत्या केल्याच्या दिवसापासून ती विवाहिता फरार असल्याची माहिती मिळाली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments