इतिहासाच्या पाऊलखुणा : हुतात्मा छत्रपती शिवाजी (चौथे) - भाग २

इतिहासाच्या पाऊलखुणा : हुतात्मा छत्रपती शिवाजी (चौथे) - भाग २

राजांना राजकोटला राजकुमारांच्या कॉलेजात शिक्षणासाठी पाठविले. १८७९  जून महिन्यात गव्हर्नर टेम्पल कोल्हापूरला आले.  त्यावेळी दरबार भरवून भेटीगाठी झाल्या . राजवाड्याचा   पायाभरणी समारंभ झाला.  नंतर महाराज राजकोटला परत गेले . त्यांची मानसिक स्थिती बिघडली म्हणून त्यांना मुंबईला  हंट ,कूक व मर्फी या इंग्रज डॉक्टरांनी तपासणी व औषधोपचार केले . नंतर झालेल्या श्री शाहू महाराजांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करून ठेवले आहे की, राजकोट राजकुमार कॉलेजात कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट उद्धट व अरेरावीची वागणूक मिळत असे  हा त्यांना स्वानुभव फारच बोलका आहे.  हाच अवमानकारक अनुभव शिवाजी महाराजांना राजकोटला आला . त्यामुळे या तरूण राजाचा संताप होणे अगदी स्वाभाविक आहे.  

राजकोट ला मिळालेल्या वागणुकीने चिडलेल्या राजांना औषध उपचार केल्यानंतर आपल्या घरी कोल्हापूरने ला नेणे आवश्यक होते .  तिथे आपल्या तरुण पत्नीच्या साहचर्यात , आपल्या मायेची कुटुंबीय माणसं आणि त्यांच्यावर जीव टाकणाऱ्या रयतेमध्ये नेणे आवश्यक होते.  परंतु तसे घडले नाही.  घडू दिले नाही या ठिकाणी संग्रामाची ठिणगी पडली.  बहुमानाची पदवी लाभलेला, तेजस्वी , इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणारा रयतेचे पंचप्राणापरिस प्यारा वाटणारा तरुण राजा इंग्रजांना मानवणारा नव्हता . त्यांना पाहिजे होते त्यांच्या पदराखाली निमूटपणे वागणारे होयबा मेंढरू.  तेव्हा हा स्वाभिमानी राजा डोईजड होईल, याच्या नेतृत्वाखाली आतले आत  घुमणारी जनता बंड पुकारून इंग्रजी सत्ता उलथवून टाकील  या धूर्त  आणि धोरनी  दृष्टीने इंग्रजांनी राजाला पत्नी,कुटुंबीय आणि करवीर जनता यांच्यापासून नियोजन पूर्वक तोडले होते . 

या कटाला सहकार्य द्यावयाला तीन  इंग्रजी डॉक्टरांची टोळी तयार ठेवली होती.  अशा रीतीने राजा विरुद्ध सत्ता यांचा हा लढा सुरू झाला. राजा एक सरळमार्गी , भावनाप्रधान, तेजस्वी तरुण होता.  इंग्रजांनी आपल्या धोरणाला अंमलात आणायला त्यांना लागला नसता.  राजसत्तेला ते शक्य होते . परंतु घडत असलेल्या घटनांनी जनता या वेळी फारच भडकलेली होती . दुष्काळाने लोक संतप्त झाले होते आणि शिवाजीराजे यांच्या वागणुकीमुळे एक तेजस्वी व त्याच्या भोवती निर्माण झाले होते.  त्यामुळे इंग्रजांना शक्य होईल म्हणून त्यांनी मानसिक बिघडलेली स्थिती असे फालतू कारण निर्माण करून राजाला महाबळेश्वर, निलगिरी, पुणे आदी ठिकाणी फिरवले व अखेरीस कोल्हापूरला आणले तिथे एडमंड  फॉक्स नावाच्या  इंग्रजाची राजाच्या शिक्षणावर व प्रकृतीवर देखरेख करण्यासाठी खास पालक म्हणून नेमणूक केली.  महाराजांनी पुढे आपल्या निवेदनात स्पष्ट पणे नमूद करून ठेवले आहे की,राजपुत्राचे शिक्षण त्याच्या संस्थानात व प्रजे मध्ये झाले पाहिजे.  त्याला त्यांच्यापासून दूर ठेवतात ठेवून एखाद्या युरोपियन पालकाच्या स्वाधीन  करू नये. 

 

एडमंड बॉक्स हा हाडाचा इंग्रज होता.  त्याने आपल्या डायरीत शिवाजी राजांबद्दल अनेक नोंदी करून ठेवल्या आहेत . फॉक्सची  नेमणूक राजा नामधारी गुलाम राहिला पाहिजे अशा खास हेतूनेच केलेली होती . त्यानुसार तो राजाशी एका विशिष्ट दृष्टिकोनातून हेतुपूर्वक वागत असे.  राजाला घरच्या लोकांपासून त्याचप्रमाणे समाजापासून ही संपूर्णपणे तोडून आपल्या समोर ठेवायचा . यासाठी त्याने केलेल्या दोन वर्षाच्या सतत या प्रयत्नांचा तपशील त्यांनी आपल्या नोंदीत दिला आहे. 

 या नोंदी पाहता राज्याच्या प्रमुख राजाच्या प्रकृतीबद्दल त्यात कुठेच तक्रार नाही . परंतु राजा त्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही . त्यांच्या तालावर नाचत नाही उलटपक्षी स्वतंत्र जीवन जगू पाहतोय.  तसेच यावरून सिद्ध होते की इंग्रजी जुलमी व दुटप्पी राजकारणाची त्याला मनस्वी चीड होती व संधी सापडेल त्या वेळी ती प्रकट करावयाचा हा बेडर तरुण त्यामुळेच भीत नव्हता . त्यामुळे चिडून संतापून  क्रूरपणे त्याला चाबकाने मारहाण केली जात असे.  इंग्रज डॉक्टराने प्रकृतीबद्दल समाधानकारक मत दिलेले आहे . इंग्रजांच्या अत्याचारांना निमूटपणे तोंड देत होता.  त्याने हार खाल्ली नाही ,तो शरण नाही गेला नाही ,आपल्या कमालीचा शांतपणा  आणि सोशिकपणाने त्याने इंग्रजांना नामोहरम केले .(क्रमशः)

Post a Comment

0 Comments